Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेचा ठरला होता साखरपुडा,मात्र झालेच नाही लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 13:12 IST

'भाभीजी घर पर है' या मालिकेतून रसिकांची मनं जिंकणारी भाभीजी म्हणजेच शिल्पा शिंदे काही दिवसांपूर्वी 'भाभीजी घर पर है' ...

'भाभीजी घर पर है' या मालिकेतून रसिकांची मनं जिंकणारी भाभीजी म्हणजेच शिल्पा शिंदे काही दिवसांपूर्वी 'भाभीजी घर पर है' या मालिकेच्या निर्मात्यांबरोबर वाद झाल्यानं शिल्पानं मालिकेतून काढता पाय घेतला होता.या कारणामुळे शिल्पा शिंदे चर्चेत आली होती. त्यानंतर आता आणखी एका कारणामुळे शिल्पा शिंदे चर्चेत आली आहे.यावेळी ती तिच्या करिअमुळे नाहीतर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.इंडस्ट्रीत आजही अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे तरीही लग्नबंधनात अडकलेले नाहीत.त्यांनी लग्नाला महत्त्व न देता आपल्यानुसार आयुष्य एन्जॉय करतायेत.या यादीत आता अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदेही गणली जात आहे.काही वर्षापूर्वी शिल्पा शिंदेचे लग्न अभिनेता रोमित राजसोबत ठरले होते. इतकेच नाहीतर लग्नाच्या आमंत्रण पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या.काही कारणामुळे रोमितसह शिल्पाने जमलेले लग्न मोडले.यानंतर रोमिने टीना कक्कडसोबत लग्न करत संसार थाटला.‘मायका’ आणि ‘माता-पिता के चरणों में स्वर्ग’ या मालिकेत शिल्पा आणि रोमित दोघांनी एकत्र काम केले आहे.मायका मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 29 नवंबर 2009 मध्ये गोव्यामध्ये या दोघांचे थाटात लग्न होणार होते. ठरलेल्या वेळेनुसार हे लग्न काही झालेच नाही. शिल्पा आणि रोमित दोघेही चांगल्या ट्युनिंगमुळेच प्रेमात पडले होते.मात्र काही दिवसानंतर रोमितची वागणूक बदलत गेली.शिल्पाच्या आई-वडीलांविषयी ही तो आदराने बोलत नसल्याचे लक्षात येताच शिल्पाने हे नाते सुरू होण्याआधीच संपवण्याचा निर्णय घेतला.