Join us

सैराटच आॅफिशियल पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 09:14 IST

 नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय स्तरापर्यत धूमाकूळ घातलेला दिसत आहे. या चित्रपटाचे एक एक पैलू ...

 नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय स्तरापर्यत धूमाकूळ घातलेला दिसत आहे. या चित्रपटाचे एक एक पैलू जसे बाहेर पडत आहे त्याप्रमाणे ते प्रेक्षकांच्या मन जिंकत आहे. चित्रपटातील गाण्यांनी तर अक्षरश: प्रेक्षकांना वेड करून ठेवले आहे. तसेच झिंगाट या गाण्याने तर खरंच प्रेक्षकांना झिंगच चढलेली दिसत आहे. या चित्रपटातील गाणी, टीझर, कास्ट यासर्व गोष्टी ज्याप्रमाणे आफिशियल बाहेर पडल्या आहेत, त्याचप्रमाणे चित्रपटाचे पोस्टर देखील आॅफिशियली नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या माध्यमातून सैराट या चित्रपटाचे पोस्टरदेखील प्रेक्षकांना आकर्षित करेल हे नक्की. हा चित्रपट एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठविडयात प्रदर्शित होणार आहे.