Join us

​सिद्धी म्हणतेय... कुछ ना कहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 15:04 IST

लव्ह लग्न लोचा या मालिकेत काम करणाऱ्या सिद्धी कारखानीसने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ...

लव्ह लग्न लोचा या मालिकेत काम करणाऱ्या सिद्धी कारखानीसने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धी कुछ ना कहो... हे गाणे गाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओविषयी सिद्धी सांगते, "आम्ही रात्रीच्या वेळात मालिकेचे चित्रीकरण करत होतो. काही केल्या वेळ जातच नव्हता. मी आणि रुचिताने मेकअप रूममध्ये आशिकी या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्यदेखील केले. पण रुचिताचा शॉर्ट लागल्यानंतर ती चित्रीकरणासाठी गेली. त्यावेळी मेकअपरूममध्ये एकटी बसून मी पूर्ण कंटाळली होती. त्यामुळे मी कुछ ना कहो... हे गाणे गायले आणि त्याचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला. खरे तर एक टाईमपास म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. पण माझ्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मला या व्हिडिओला मिळत आहे. माझा आवाज खूप छान असल्याचेही अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे."