Join us

एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमुळे श्वेता तिवारीचं मोडलं लग्न? एक्स पती राजाने म्हटलं- "खूप आधीपासूनच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:18 IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

Shweta Tiwari : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तिचे दोन्ही लग्न अयशस्वी ठरले. ती सर्व आव्हाने स्वीकारून पुढे जात असतानाच तिचा एक्स पती राजा चौधरीने पुन्हा एकदा अभिनेत्रीवर गंभीर वैयक्तिक आरोप केले आहेत.

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी १९९८ मध्ये लग्न केले होते आणि २००७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटादरम्यान अभिनेत्रीने राजावर मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत तिचे दुःख व्यक्त करताना श्वेताने सांगितले की, ती तिची लहान मुलगी पलक तिवारीला घेऊन पोलिस स्टेशनला जात असे. आता अलिकडेच एका मुलाखतीत राजाने श्वेतावर गंभीर आरोप केले आहेत. राजा म्हणाला की, त्याचे लग्न खूप आधीच तुटले असते, कारण त्याची एक्स पत्नी श्वेताचे सेझान खानशी प्रेमसंबंध होते. हे लग्न असेच लांबले. त्याचे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

'कसौटी जिंदगी के' मालिकेत राजाने श्वेतावर तिचा सहकलाकार सेझान खानसोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. राजा चौधरीने सांगितले की, "एकदा तो श्वेताच्या शूटिंग सेटवर गेला होता जिथे ती अभिनेत्री सेझान खानसोबत कारमधून येताना दिसली. त्यावेळी त्याला वाटले की कदाचित दोघेही काही काळ एकत्र असतील. त्याने श्वेताला आणखी एक संधी दिली. ही तिची चूक होती."

यापूर्वीही श्वेता तिवारीने सेझान खानसोबतच्या अफेअरच्या विधानांना फेटाळून लावले होते आणि राजा चौधरीने शारीरिक छळ आणि मारहाणीमुळे तिचे लग्न मोडल्याचे म्हटले होते. श्वेताने २०१० मध्ये दिलेल्या मुलाखतीत सेझानसोबतच्या अफेअरच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. तिने म्हटले होते की, "माझ्याकडे अफेअरसाठी वेळ कुठे होता? मी ३० दिवस शूटिंग करायचे." तिने सेझानचा द्वेष करत असल्याचेही सांगितले आणि पॅचअपच्या अफवांना नकार दिला.

श्वेताने राजावर दारूच्या नशेत तिच्यावर हल्ला केल्याचा आणि सेटवर गोंधळ घालण्याचा आरोप केला होता. २०२४ मध्ये दिलेल्या मुलाखतीत श्वेताने सांगितले की, 'सामाजिक दबावामुळे आणि तिची मुलगी पलकसाठी ती ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिली. घटस्फोटाचा एक भाग म्हणजे मालमत्तेचा वाद होता, ज्यामध्ये श्वेताने राजाला ९३ लाखांचा फ्लॅट दिला.'

टॅग्स :श्वेता तिवारीटिव्ही कलाकार