Join us

नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कुलमध्ये शिकतो मराठी सेलिब्रिटीचा मुलगा, दाखवली हॉस्टेलची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:02 IST

लेकाला शाळेत सोडल्यानंतर अभिनेत्री भावुक झाली

नाशिकची भोसला मिलिटरी स्कुल नामांकित शाळा आहे. मुलांना चांगलं शिक्षण पुरवणारी, त्यांना शिस्त लावणारी आणि त्यांच्यात संस्कार रुजवणारी अशी ही शाळा आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातील एका सेलिब्रिटी कपलचा मुलगा याच शाळेत शिकतो. आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी हे कपल नुकतंच भोसला मिलिटरी स्कुलमध्ये आणि शाळेच्या हॉस्टेलमध्येही गेले होते. हॉस्टेलची झलक त्यांनी आपल्या व्लॉगमधून दाखवली आहे.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत दिसलेले अभिनेता राहुल मेहेंदळे (Rahul Mehendale) आणि अभिनेत्री श्वेता मेहेंदळे (Shweta Mehendale) यांचा मुलगा आर्य हा  नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कुलमध्ये शिकायला आहे. काही दिवसांपूर्वी श्वेताने तिच्या युट्यूबवर व्लॉग केला होता. यामध्ये श्वेता आणि राहुल दोघंही आर्यला शाळेत सोडण्यासाठी नाशिकला गेले. श्वेताने चाहत्यांना मिलिटरी स्कुलची झलक दाखवण्यासाठी विशेष हा व्लॉग केला. यामध्ये शाळेचं हॉस्टेल ज्याला भवन म्हणतात ते दिसत आहे. मोठा लांब हॉल आहे ज्यामध्ये एकावर एक बेड आहेत. तसंच बाजूला लॉकरही आहेत. आर्यला हॉस्टेलमध्ये सोडताना श्वेता भावुक झाली. तिने लेकाला घट्ट मिठी मारली. भवनबाहेरचं भलंमोठं मैदान दिसत आहे. जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर तो परत आर्य पुन्हा शाळेत गेला आहे. 

श्वेता मेहेंदळे युट्यूबवर अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा विविध विषयांवर व्लॉग घेऊन येते. तिला फिरण्याची खूप आवड आहे. ती स्वत: बाईकवर दूरवर एकटी फिरायला गेली आहे. याचेही व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. 

राहुल आणि श्वेता गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत.श्वेता आणि राहुल या जोडीमध्ये जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे. 'नायक', 'या गोजिरवाण्या घरात', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 'धूम 2 धमाल', 'पाच नार एक बेजार', 'सगळं करुन भागलं', 'असा मी तसा मी', 'जावईबापू जिंदाबाद' अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.  

टॅग्स :श्वेता मेहंदळेमराठी अभिनेतानाशिक