वादग्रस्त ‘अंगुरी भाभी’ शिल्पा शिंदेचा ‘बिग बॉस’ प्रवेश निश्चित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 21:41 IST
काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती की, ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे ...
वादग्रस्त ‘अंगुरी भाभी’ शिल्पा शिंदेचा ‘बिग बॉस’ प्रवेश निश्चित!
काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती की, ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे ‘बिग बॉस’च्या सीजन ११ मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु आता आम्ही पक्की बातमी तुम्हाला सांगणार आहोत, ती म्हणजे शिल्पाचे नाव या शोसाठी निश्चित झाले आहे. शिल्पाच्या नावावर शिक्कामोर्तब तेव्हा झाले जेव्हा ती या शोमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून किती पैसे वसूल करणार आहे? याबाबतची चर्चा रंगू लागली. खरं तर हे ऐकू न तुम्हालाही धक्काच बसेल. कारण शिल्पाने केलेली पैशांची मागणी धक्का देणारी आहे. होय, शिल्पाने बिग बॉसच्या निर्मार्त्यांकडे एका एपिसोडसाठी चार लाख रुपयांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शिल्पाची ही मागणी निर्मात्यांनीही मान्य केली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या ११ व्या सीजनमध्ये आता शिल्पा शिंदे हे नाव निश्चित झाले आहे. शिल्पा शिंदे टीव्ही शो ‘भाभी जी घर पर है’मध्ये अंगुरी भाभाजीची भूमिका साकारत होती; मात्र निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिला शोमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यावेळी शिल्पाने निर्मात्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. जेव्हा शिल्पाने हे आरोप केले होते, तेव्हा दरदिवशी याप्रकरणाला वेगळे वळण मिळत होते. असो, शिल्पाला या शोने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली असून, तिच्या फॅन्स फॉलोविंंगची संख्याही चांगली आहे. तिचे चाहते आजही तिला छोट्या पडद्यावर बघू इच्छितात. कदाचित याच कारणामुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी तिच्या सर्व अटी मान्य करीत तिची निवड केली असावी. वृत्तानुसार बिग बॉस यंदा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. शो मेकर्स सध्या सातत्याने स्पर्धकांचा शोध घेत आहेत. कारण शो सुरू होण्यास खूपच कमी अवधी उरला आहे. गेल्या सीजनमध्ये शोमध्ये सर्वसामान्य अर्थात इंडियावाले विरुद्ध सेलिब्रिटी असा सामना रंगला होता. यावेळेस शोमध्ये थोडासा ट्विस्ट आणण्यात आला असून, सर्वसामान्य स्पर्धकांना शोमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जाणार नाहीत; मात्र या स्पर्धकांना टास्कच्या माध्यमातून चांगले पैसे कमविता येणार आहेत. या सीजनलाही सलमान खान होस्ट करताना बघावयास मिळणार आहे.