Join us

शिल्पा शिंदेवर अश्लील जोक करणाऱ्या राजू श्रीवास्तवला यूजर्सनी सुनावले; मागावी लागली माफी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 18:46 IST

कलर्स या चॅनेलवर प्रसारित होणºया ‘एंटरटेनमेंट की रात’मध्ये नुकताच कॉमेडियन राजू श्रीवास्तव सहभागी झाला होता. त्याच्यासोबत विंदू दारा सिंग, ...

कलर्स या चॅनेलवर प्रसारित होणºया ‘एंटरटेनमेंट की रात’मध्ये नुकताच कॉमेडियन राजू श्रीवास्तव सहभागी झाला होता. त्याच्यासोबत विंदू दारा सिंग, हितेन तेजवानी आणि लोपामुद्रा राऊत यांनीही हजेरी लावली होती. यावेळी कॉमेडियन राजूने बिग बॉसमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांची खिल्ली उडविली. त्यातच राजूने शिल्पा शिंदेबद्दल असे काही वक्तव्य केले ज्यामुळे सोशल मीडियावर त्याचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. सौरभ सागर नावाच्या एका यूजरने ३९ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विटर अकाउण्टवर शेअर करताना त्यात म्हटले की, ‘तू आभार मानायला हवे की, तुला एका चॅनेलने नाव दिले, सन्मान दिला अन्यथा तुझे नाव एखाद्या कागदाच्या चिठ्ठीवरदेखील कोणी लिहिले नसते.’ दरम्यान, राजूने शिल्पाबद्दल कॉमेण्ट करताना म्हटले होते की, ‘संपूर्ण घरात आई बनून फिरत आहेस, आई बनण्याचा एवढाच शौक आहे तर घराबाहेर ये शक्ती कपूर तुझी प्रतीक्षा करीत आहे.’ राजूच्या याच वाक्याचा सोशल मीडियावर समाचार घेतला जात आहे. सुमित कादेल नावाच्या यूजरने लिहिले की, राज श्रीवास्तवने शिल्पावर केलेली टीका ही पूर्णत: चुकीची आणि अपमानजनक आहे. त्यासाठी राजूने जाहीरपणे माफी मागायला हवी. राखी खरे नावाच्या एका यूजरने लिहिले की, राजू श्रीवास्तवने आज कॉमेडीच्या नावे खूपच खाणेरडा जोक केला. त्यासर्व सेलिब्रिटींना लाज वाटायला हवी, जे राजू श्रीवास्वची घाणेरडी कॉमेडी ऐकून हसत होते. तू कोण्या महिलेचा अशाप्रकारे अपमान करू शकत नाहीस.’ दरम्यान, सोशल मीडियावर होत असलेल्या टीका बघून राजू श्रीवास्तवने लगेचच त्याच्या फेसबुक अकाउण्टवर याविषयी त्याची बाजू मांडली. त्याने लिहिले की, प्रिय फॅन्स, तुमच्या माझ्याबद्दलच्या अशा प्रकारच्या कॉमेण्ट वाचून आश्चर्यचकित झालो. यामुळेच मी माझी बाजू मांडत आहे. १) तुम्ही हा विचार कसा केला की, मी एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेची खिल्ली उडविणार? मी स्त्री आणि स्त्री जातीचा आदर करतो. कारण मी पती आणि एका मुलीचा बाप आहे. २) माझ्या मनात शिल्पाजी विषयी प्रचंड आदर आहे. त्यांच्यासोबत मी को-स्टार म्हणून काम केले आहे. ३) माझे डायलॉग चॅनल आणि निर्मात्यांनी एडिट करून चुकीच्या पद्धतीने दाखविले आहेत. कारण माझा ओरिजनल डायलॉग असा होता की, ‘तुला आई बनण्याचा एवढाच शौक आहे तर बाहेर ये, शक्ती कपूर तुझी प्रतीक्षा करीत आहे. त्याच्या एका चित्रपटात त्याची आई बनण्यासाठी. तोच नव्हे तर नवाजुद्दीन सिद्दीकी हा देखील त्याच्या चित्रपटात तुला आई बनविण्यासाठी उत्सुक आहे.