झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेला सुरूवातीपासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. कथानकात येणाऱ्या ट्विस्ट आणि टर्नमुळे मालिकेला चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान आता मालिकेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. लक्ष्मीच्या ६०व्या वाढदिवसादिवशी एक नवीन संकट उभे येऊन ठाकणार आहे.
लक्ष्मीच्या ६० व्या वाढदिवसाचा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लक्ष्मीला वाटतं की घरात कुणालाही तिचा वाढदिवस लक्षात नाही. मात्र श्रीनिवास तिला खास सरप्राईज देणार आहे. लक्ष्मीनिवास मध्ये लक्ष्मीच्या वाढदिवसाची तयारी सुरू झालेय. त्याचवेळी जयंत फोन करून आपल्या घरी पार्टी ठेवण्याचा आग्रह धरतो, पण भावना आधीच सगळं ठरलं असल्याचं सांगते. भावनाच्या घरी बॉलिवूड थीमवर भव्य सरप्राईज पार्टी आयोजित केली जाते.
आता पोलिस नेमके का आले आहेत?सगळे जण बॉलिवूड थीमवर पार्टीत सहभागी होतात. गाणी, नृत्य आणि धमाल सुरू होते. संपूर्ण कुटुंब एकत्र पाहून लक्ष्मी भावूक आहे आणि तिला जान्हवीची आठवण येतेय. तिला हे माहीत नाही की जान्हवी पार्टीत उपस्थित आहे.आनंदाच्या या क्षणांमध्ये अचानक पोलिस पार्टीत दाखल होतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. आता पोलिस नेमके का आले आहेत? या आनंद प्रसंगी कोणतं नवं संकट उभं राहणार आहे? जान्हवी सगळ्यांच्या नजरेस पडणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लक्ष्मीनिवासच्या आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
Web Summary : Zee Marathi's 'Laxmi Niwas' faces a twist! Laxmi's 60th birthday brings unexpected trouble. A surprise Bollywood-themed party is underway, but police arrive, shocking everyone. Will Janhavi be revealed? A new crisis unfolds amidst the celebration.
Web Summary : ज़ी मराठी के 'लक्ष्मी निवास' में ट्विस्ट! लक्ष्मी के 60वें जन्मदिन पर अप्रत्याशित संकट आता है। एक सरप्राइज बॉलीवुड-थीम वाली पार्टी चल रही है, लेकिन पुलिस के आने से सब चौंक जाते हैं। क्या जान्हवी का खुलासा होगा? उत्सव के बीच एक नया संकट सामने आता है।