Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये धक्कादायक वळण; गौरीसमोर येणार दादांचा खरा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:05 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये शिर्के पाटील कुटुंबात नवीन वादळ येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकाc नुकतेच मालिकेत जयदीप आणि गौरीचे पुन्हा एकदा लग्न पार पडले. त्यानंतर आता शिर्के -पाटील कुटुंबात नवीन वादळ येणार आहे. गौरीच्या वडिलांचा खून कोणी केला आहे, यामागचे खरे सत्य गौरीसमोर येणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते आहे की, गौरी सर्वांना सांगते आहे की, इतकी वर्षे आपण जे समजत होतो की माझ्या आबांचा खून गुंडांनी केला आहे. ते खोटे होते. त्यावर माई विचारतात खरं काय आहे. त्यावर गौरी म्हणताना दिसते आहे की, हे खरं आहे की माझ्या आबांचा खून दादांच्या हातातून झाला आहे. गौरीचे हे म्हणणे ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसतो.

याआधी गौरीला तिच्या आबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दादा चाबकाने फटके खाताना दिसतात. हे पाहून गौरीला खूप धक्का बसतो. त्यामुळे ती नेमके दादा असे का करतात, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करते. मात्र त्यानंतर तिच्या आबांचा खून दादांनी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शिर्के पाटील यांच्या घरात कोणते नवीन वादळ येणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

 

टॅग्स :स्टार प्रवाह