Join us

Shocking! तारक मेहता का उल्टा चष्मातील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीने नुकताच केला शेवटचा भाग चित्रीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 12:43 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ...

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एकच वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज प्रेक्षक दिशाला द्याबेन म्हणूनच ओळखतात. पण दिशाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.दिशाने खिचडी या मालिकेत तर देवदास, जोधा अकबर यांसारख्या मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण तिला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली. दिशा गरोदर असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण दिशा त्याही अवस्थेत गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेचे चित्रीकरण करत आहे. चित्रीकरणाच्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम तिची खूप काळजी घेते. तसेच तिला त्रास होऊ नये यासाठी प्रोडक्शन हाऊस तिला काहीच तास चित्रीकरणासाठी बोलवत असे. तसेच तिची सासू तिची काळजी घेण्यासाठी सतत सेटवर असायची. या सगळ्यामुळेच तिच्या फॅन्सना तिला आजवर मालिकेत पाहायला मिळाले होते. पण आता दिशाला काही दिवस तरी प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार नाही. ती मॅटर्निटी ब्रेकवर गेली असून ती आता काही महिन्यांनंतरच परतणार आहे. दिशाने तिचा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ब्रेकच्या आधीचा शेवटचा भाग नुकताच चित्रीत केला. १७ सप्टेंबरला दिशाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या दिवशीच तिने तिच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले. दिशाला सध्या आठवा महिना सुरू असून आता ती पुढील काही दिवस काम न करता केवळ आराम करणार आहे. दिशा मालिका सोडत नसली तरी काही महिने तरी प्रेक्षकांना तिला मालिकेत पाहायला मिळणार नाही. आता दिशा परत कधी येते याची वाट तिच्या चाहत्यांना पाहायला लागणार आहे. Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीने शेअर केले एक गुपित