विशेष म्हणजे सुरजने गुन्हा कबूल केला असून, चैनीचे आयुष्य जगण्याच्या हेतुनेच चोरी केल्याचे म्हटले आहे. सुरजने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मिळविली आहे. फर्राटेदार इंग्रजी बोलणारा सुरज तायक्वांदो स्पर्धेचा राष्टÑीय चॅम्पियनदेखील आहे. पोलिसांनी सुरतसह त्याच्या तीन साथीदारांनाही दिल्लीच्या रणहौला परिसरातून अटक केली. सुरजला त्याच्या गु्रपमध्ये फायटर नावाने ओळखले जाते.
डीसीपी एम.एन. तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीने तीन डझनांपेक्षा अधिक चोरीच्या घटना कबूल केल्या आहेत. सुरजजवळून एक पिस्तूल, काळ्या मिर्चीचा स्प्रे आणि एक स्कूटरही हस्तगत करण्यात आले आहे. त्याचबरोबर याविषयीचादेखील खुलासा करण्यात आला की, त्याला ब्रॅण्डेड कपडे आणि शूजचा शौक आहे. याशिवाय सुरजला ड्रिक करण्याचीही सवय असल्याने तो नियमितपणे क्लब जात होता. त्याचबरोबर सुरजचे बºयाचशा मुलींशी अफेअरही सुरू होते. त्याच्या परिवाराने त्याची वागणूक बघून त्याला घराबाहेर काढले होते.