शॉकिंग... ‘बालिका वधू’ प्रत्युषा बॅनर्जी हिची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 22:30 IST
‘बालिका वधू’मधील आनंदी अर्थात प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या केल्याची खबर आहे. आज शुक्रवारी आपल्या राहत्या घरी प्रत्युष्याने गळफास लावून ...
शॉकिंग... ‘बालिका वधू’ प्रत्युषा बॅनर्जी हिची आत्महत्या
‘बालिका वधू’मधील आनंदी अर्थात प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या केल्याची खबर आहे. आज शुक्रवारी आपल्या राहत्या घरी प्रत्युष्याने गळफास लावून आत्महत्या केली. ताज्या बातमीनुसार. प्रत्युषाने कांदीवलीस्थित आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. प्रत्युषाला तात्काळ मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तूर्तास या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक कारणांमुळे प्रत्युषाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. सूत्रांच्या मते, बॉयफ्रेंडसोबत झालेल्या वाद हे कथितरित्या या आत्महत्येमागचे कारण आहे. अभिनेता राहुल राज सिंग याच्यासोबत प्रत्युषा रिलेशनशिपमध्ये होती. हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. गतवर्षी प्रत्युषाने राहुलसोबत गुपचूप लग्न केल्याची खबर होती. यावर्षी जानेवारीत प्रत्युषाने लोन रिकव्हरीसंदर्भात मुंबई पोलिसांवर गैरवर्तन केल्याचा आरोप लावला होता.जमशेदपूरमध्ये जन्मलेली २४ वर्षीय अभिनेत्री ‘बालिका वधू’ या मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. या मालिकेमुळे प्रत्युषा घराघरात पोहोचली. अर्थात कालांतराने निर्मात्यासोबत वाद झाल्याने प्रत्युषाने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. ‘झलक दिखला जा’च्या पाचव्या आणि ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमध्यही ती दिसली होती.