Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शोएब इब्राहिम आणि दिपाली कक्कर झळकणार कोई लौट के आया है या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 10:41 IST

कोई लौट के आया है या मालिकेत सध्या शोएब इब्राहिम आणि सुरभी ज्योती प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील ...

कोई लौट के आया है या मालिकेत सध्या शोएब इब्राहिम आणि सुरभी ज्योती प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकार, या मालिकेची कथा यामुळे प्रेक्षकांना ही मालिका प्रचंड आवडत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता ससुराम सिमर का फेम दिपाली कक्करचा प्रवेश होणर आहे. दिपाली गेली अनेक वर्षं ससुराल सिमर का या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत शोएब तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकत होता. या मालिकेच्या सेटवरच शोएब आणि दिपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपल्या नात्याची कबुली मीडियासमोर दिली असून शोएबने मीडियासमोर दिपालीशी लग्न करण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. दिपाली आणि शोएब ससुराल सिमर का या मालिकेत एकत्र काम करत असल्याने त्यांना एकत्र वेळ घालवता येत होता. पण शोएबने या मालिकेला काही महिन्यांपूर्वी रामराम ठोकला आणि आता शोएबनंतर दिपालीनेदेखील ही मालिका सोडली असून ती शोएबसोबतच कोई लौट के आया है या मालिकेत झळकणार आहे. पण या मालिकेत ती शोएबच्या नायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीये तर दिपाली या मालिकेत शोएबच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. खऱ्या आयुष्यात दिपाली शोएबची प्रेयसी असली तरी या मालिकेत ज्योती त्याची प्रेयसी दाखवण्यात आली आहे. या दोघांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे यांच्या केमिस्ट्रीबाबत दिपालीची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणे मजेशीर ठरणार आहे. या मालिकेत दिपालीची एंट्री होणार असल्यामुळे या मालिकेची सगळीच टीम खूप खूश आहे.