Join us

शिवानी घेणार क्रतिकाची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 13:57 IST

कसम या मालिकेत क्रतिका सेनगर प्रमुख भूमिका साकारत आहे. पण लवकरच या कार्यक्रमात तिची जागा शिवानी तोमर घेणार असल्याची ...

कसम या मालिकेत क्रतिका सेनगर प्रमुख भूमिका साकारत आहे. पण लवकरच या कार्यक्रमात तिची जागा शिवानी तोमर घेणार असल्याची चर्चा आहे. शिवानीने याआधी हम आपके घर में रहते है या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ऋषीच्या अपघातानंतर मालिकेत काही महिन्यांचा लीप घेतला जाणार आहे. यानंतर तन्नू प्रेक्षकांना एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. लीपनंतर तन्नूची भूमिका शिवानी साकारणार आहे. या भूमिकेसाठी क्रिस्टल डिसोझाचाही विचार करण्यात आला होता. पण या भूमिकेसाठी शिवानीची निवड करण्यात आली. प्रेक्षक क्रतिकाच्या ऐवजी शिवानीला स्वीकारतील का हे काळच ठरवेल.