Join us
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही दोघी मालिकेच्या शूटिंग दरम्यान शिवानीला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 16:55 IST

आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते.

ठळक मुद्देशिवानी आणि खुशबू यांच्यासोबत मालिकेत लव्ह लग्न लोचा फेम अभिनेता विवेक सांगळे प्रमुख भूमिका साकारत आहेत.

नवे पर्व, युवा सर्व असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. आम्ही दोघी ही नवीन मालिका झी युवा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहे. आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. अभिनेत्री खुशबू तावडे या मालिकेत मीरा हिची तर बन मास्क मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे मधुराची भूमिका सादर करत आहेत. शिवानी आणि खुशबू यांच्यासोबत मालिकेत लव्ह लग्न लोचा फेम अभिनेता विवेक सांगळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. या दोन बहिणींचे जीवन बदलून टाकणाऱ्या आदित्य गायकवाडची भूमिका विवेक साकारणार आहे.

नुकतंच मालिकेचं शीर्षक गीताच्या शूटिंग दरम्यान शिवानी बसमध्ये चढत असताना ती पडली आणि तिला दुखापत देखील झाली. तिला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण युनिटने शूटींग थांबवण्याचा निर्णय घेतला पण शिवानीने तसं होऊ दिलं नाही. तिने सेटवरतीच प्रथमोपचार करून घेतले आणि दिग्दर्शकाला पुन्हा शूटिंग सुरु करायला सांगितले. या दुखापतीमुळे तिच्या उजवं पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांध्याला इजा झाली आहे पण तिने चित्रीकरण न थांबवता तिचं काम पूर्ण केलं. तिचा हा स्वभाव आणि काम पूर्ण करण्याची जिद्द अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.