Join us
Daily Top 2Weekly Top 5

​विघ्नहर्ता गणेश या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार शिव आणि पार्वतीचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 10:31 IST

विघ्नहर्ता गणेश ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती ...

विघ्नहर्ता गणेश ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती बाप्पावर आधारित आजवर अनेक मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. पण तरीही ही मालिका आपले एक वेगळेपण जपून आहे. या मालिकेचे सादरीकरण हेच या मालिकेचे वैशिष्ट्य आहे. महाशिवरात्रीचा सण त्याच्या मंगल परंपरेसह जगभरातील शिवभक्त साजरा करतात. सोनी टीव्हीवरील ‘विघ्नहर्ता गणेश’ या सणाच्या उत्सवात भर घालणार आहे. या मालिकेत शिव आणि पार्वतीचा विवाह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या विवाहाची प्रतीक्षा कित्येक दिवसांपासून सर्वांना होती. महाशिवरात्रीच्या विशेष प्रसंगी हा विशेष विवाह सोहळा सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे मालिकेच्या निर्मात्यांनी ठरवले आहे. मालिकेतील आगामी भागामध्ये महाशिवरात्रीबद्दल वेगवेगळ्या अंगांनी विचार केला जाणार आहे. तसेच या मालिकेद्वारे प्रेक्षकांना लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, याचा गर्भिरार्थ काय आहे हे सांगितले जाणार आहे. तसेच महाशिवारात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी दंतकथा आहे. तसेच याच रात्री शिवाने तांडव नृत्य केले होते असे देखील मानले जाते. भक्तांची अशी दृढ श्रद्धा असते की, या मंगल दिवशी शिवाची उपासना केल्याने त्यांना मोक्ष मार्गाच्या अधिक जवळ पोहोचता येते.विवाहित स्त्रिया महाशिवरात्रीच्या दिवशी पतीच्या कल्याणासाठी उपवास करतात आणि अविवाहित स्त्रियांसाठी तर या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. भगवान शिवासारखा आदर्श जोडीदार मिळावा यासाठी त्या प्रार्थना करतात. आदर्श जोडीदार शोधण्याबद्दल या मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत असणारी आकांक्षा सांगते, “महाशिवरात्री सण मी मनापासून साजरा करते. माझ्या कुटुंबियांची शंकरावर दृढ श्रद्धा आहे आणि माझ्या आईची अशीच इच्छा आहे की मला शंकरासारखा जोडीदार मिळावा. या दिवशी मी उपवास करते आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करते. मला शिवासारखा पती मिळेल की नाही हे मला माहीत नाही पण तो तसा असला तर मला निश्चितच आवडेल.”विघ्नहर्ता गणेश या मालिकेत शिवची भूमिका मलखान सिंह तर पार्वतीची भूमिका आकांक्षा पुरी साकारत आहे. Also Read : टेलिव्हिजनवर काम करणे एन्जॉय करतेयः आकांक्षा पुरी