शिरिन नागिन 2मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:38 IST
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत जस्मितची भूमिका साकारणारी शिरिन सेवानी प्रेक्षकांना लवकरच एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार ...
शिरिन नागिन 2मध्ये
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत जस्मितची भूमिका साकारणारी शिरिन सेवानी प्रेक्षकांना लवकरच एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नागिन 2 या मालिकेत सध्या अनेक नव्या कलाकारांची एंट्री होत आहे. दहलीज या मालिकेत झळकलेला आर्यन पंडित या मालिकेत करणवीर बोहराच्या चुलतभावाची भूमिका साकारणार आहे तर शिरिन नागिन 2 मध्ये करणच्या बहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. अलिया ही व्यक्तिरेखा ती साकारणार असून अतिशय मस्तीखोर, आपले आयुष्यात आनंदात जगणारी अशी ही मुलगी आहे. आपल्या वयाची व्यक्तिरेखा साकारायला मिळत असल्याने शिरिन सध्या खूपच खूश असल्याचे कळतेय.