Join us

शिल्पा मालिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 11:45 IST

शिल्पा शेट्टीचे बिग बॉस 2 या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आगमन झाले. आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये तिने परीक्षकाची भूमिका साकारली ...

शिल्पा शेट्टीचे बिग बॉस 2 या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आगमन झाले. आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये तिने परीक्षकाची भूमिका साकारली आहे. ती आता मालिकेत काम करण्यास सज्ज झाली आहे. शिल्पा शेट्टी लवकरच एका मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका अनिल कपूरच्या 24 या मालिकेसारखी ठरावीक भागांची ही मालिका असणार असल्याचे म्हटले जात आहे. शिल्पाने या बातमीला दुजोरा दिला नसला तरी ठरावीक भागांच्या मालिकेत काम करायला मला आवडेल असे तिने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे शिल्पा मालिकेत काम करते की नाही हे काही दिवसांतच कळेल.