Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे'मध्ये येणार ट्विस्ट, राजनंदिनीची होणार एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 08:00 IST

‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. जनंदिनीची एंट्री हि टेलिव्हिजन क्षेत्रातील सगळ्यात जास्त उत्कंठावर्धक होती असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही.

ठळक मुद्देविक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची एंट्री कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत एंट्री कधी होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. राजनंदिनीची एंट्री हि टेलिव्हिजन क्षेत्रातील सगळ्यात जास्त उत्कंठावर्धक होती असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. शीर्षक गीतात सावलीतून दिसणारा हा चेहरा आता सगळ्यांच्या समोर शेवटी आला. अभिनेत्री शिल्पा तुळसकर हि भूमिका साकारत आहे.

या बद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, "मला हि माझ्या एंट्री बद्दल उत्सुकता होती आणि सगळेजण मला विचारात होते. पण जर मी त्यांना सांगितलं कि मला हि नाही माहिती कि माझी एंट्री कधी होणार आहे तर त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसायचा.

मी सुरुवातीचे आणि मधले काही भाग मला जसं जमेल तसं पाहिले. इशाचा भाग मी जास्त न बघण्याचा प्रयत्न केला, कारण कथानकाला मला नव्याने सामोरं जायचं आहे त्यामुळे आधीच्या इशाच्या प्रसंगांचा प्रभाव राजनंदिनीच्या प्रसंगांवर नको पडायला म्हणून हा प्रयत्न होता." सुबोधसोबत पहिल्यांदाच काम करत असल्याचा अनुभव शेअर करताना शिल्पा म्हणाली, "सुबोध सोबत मी पहिल्यांदाच काम करतेय आणि तो माझा अत्यंत आवडता नट आहे. तो टॅलेंटेड तर आहेच आणि त्याची शिस्त, त्याची वैचारिकता मी त्याच्या कामातून बघत आली आहे. त्याच्यासोबत काम करण्याची उत्सुकता म्हणण्यापेक्षा त्याला जवळून काम करताना मला बघायचं होतं आणि ती इच्छा तुला पाहते रे या मालिकेमुळे पूर्ण झाली."

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे