Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी 'बिग बॉस'मध्ये या मराठी अभिनेत्यांनी करावी एंट्री अशी 'शिल्पा शिंदे'ची इच्छा?जाणून घ्या कोण आहे ते चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 11:37 IST

मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने नुकताच 'बिग बॉस-11'चं विजेतेपद पटकावलं.प्रतिस्पर्धी स्पर्धक हिना खान हिच्यावर मात करत 'बिग बॉस-11'चे जेतेपद आपल्या ...

मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने नुकताच 'बिग बॉस-11'चं विजेतेपद पटकावलं.प्रतिस्पर्धी स्पर्धक हिना खान हिच्यावर मात करत 'बिग बॉस-11'चे जेतेपद आपल्या नावावर केले.'भाभीजी घर पर है'या मालिकेतील 'अंगुरी भाभी' या भूमिकेमुळे शिल्पा शिंदे घराघरात पोहचलीच होती.मात्र 'बिग बॉस-11'च्या निमित्ताने बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्यापासून शिल्पा शिंदेची जोरदार चर्चा सुरु झाली होती.बिग बॉसच्या घरातील तिचं वागणं,सहका-यांशी होणारी भांडणं आणि वाद यामुळे शिल्पा शिंदे हिचे नाव प्रत्येक रसिकांच्या ओठावर होतं.'बिग बॉस-11'च्या शेवटच्या टप्प्यात तिच्या आईची झालेली एंट्री,तिच्या लग्नावरुन उठलेला वाद यामुळे शिल्पा शिंदेच 'बिग बॉस-11'चे जेतेपद पटकावणार याची जोरदार चर्चा रंगली होती आणि अखेर तसंच घडलं.बिग बॉस-11नंतर शिल्पा शिंदेची चर्चा अजूनही सुरुच आहे.शिल्पा पुढे काय करणार याबाबतही चर्चा रंगल्या आहेत.ती मालिका करणार की सिनेमा किंवा मग आणखी दुस-या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकणार का याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.खुद्द शिल्पाला मात्र पुन्हा बिग बॉस करायचं आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकदा विजेतेपद पटकावल्यानंतर पुन्हा बिग बॉस तिला का बरं करायचं असेल ? मात्र तसं काहीही नाही.शिल्पाला पुन्हा बिग बॉस करायचं आहे याचा अर्थ की तिला मराठी बिग बॉस करायचे आहे.मात्र यावेळी तिला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून जायचं नाही.तर मराठीत बिग बॉस आल्यास या शोला दबंग सलमान खानप्रमाणे शो होस्ट करण्याची शिल्पाची इच्छा आहे.तसंच बिग बॉसच्या घरात कोणते मराठी सेलिब्रिटी यावेत हे सुद्धा शिल्पाने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. सुबोध भावे,नाना पाटेकर,संतोष जुवेकर आणि भरत जाधव यांनी मराठी बिग बॉसमध्ये सहभागी व्हावं अशी तिची इच्छा आहे.मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार असलेले भरत जाधव आपल्याप्रमाणेच मराठी बिग बॉसमध्ये रसिकांचं मनोरंजन करतील असा विश्वास शिल्पा शिंदेला वाटतो आहे. मराठी बिग बॉसच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून रिएंट्री मारण्याचा मानस शिल्पाने व्यक्त केला असला तरी तिला मालिकांमध्ये पुन्हा अडकायचे नाही.बिग बॉसचे विजेतेपद पटकावल्यामुळे मोठी स्वप्नं पाहायचं जणू तिने ठरवले आहे.त्यामुळेच की काय मालिकांपेक्षा रुपेरी पडदा हे आपलं ध्येय असून मराठी सिनेमात काम करण्याची तिची इच्छा आहे.