पुढे शिल्पादेखील तिच्या पहिल्या प्रेमाचा किस्सा सांगते. ती म्हणतेय की, ‘पहिल्यांदा मी आॅटोरिक्षामध्ये किस केला. दहावीत असताना मी पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये अडकले होते. त्याचबरोबर ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडचाही एक किस्सा शेअर करते. शिल्पा सांगते की, ‘आम्ही रिक्षात बसलो होतो. तेव्हा तो मला म्हणाला की, माझ्या मित्रांनी पैज लावली की, तू मला किस देणार नाहीस. तेव्हा मी म्हटले, एवढंच ना... जा त्यांना सांग की, मी तुला किस दिला. माझे हे शब्द ऐकून तो खूप खूश झाला. परंतु मी लगेचच बोलली की, मी किस दिला की नाही दिला हे बघण्यासाठी ते येणार आहेत काय? सांगायला काय जाते. हे शब्द ऐकताच त्याच्या चेहरा जणू काही कोमेजून गेला.’
त्यानंतर बंदगी सांगते की, ‘मी पहिल्यांदा शाळेतील लाल रंगाच्या भिंतीमागे किस केला होता. तेव्हा मला असे वाटले की, हे मी काय केले?’ बंदगी बोलत असतानाच पुनीश म्हणतो की, कॉलेजमध्ये असताना माझ्या दोन गर्लफ्रेंड्स होत्या. एकदा मला दोघींचा सामना करावा लागला. दोघीही सकाळी-सकाळीच कॉलेजमध्ये आल्या होत्या. दोघी एकत्र येतील याचा मी विचार केला नव्हता. त्यानंतर दोघींनीही माझी धुलाई केली. त्यानंतर मी माझी गाडी घेऊन तेथून पळून गेलो.