स्पॉटबॉय डॉट कॉमशी बोलताना शिल्पा तिच्या लग्नाविषयी सांगितले की, ‘मी असे म्हणत नाही की, आयुष्यात मी कधीच लग्न करणार नाही. खरं तर माझ्या भविष्यात नेमके काय लिहिले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी हे स्पष्ट करू इच्छिते की, सध्यातरी मी लग्नाविषयी विचार करीत नाही. मला सिंगल राहायला आवडते. कारण मी सध्या स्वतंत्र जीवन जगू इच्छिते.’
पुढे बोलताना शिल्पाने म्हटले की, मला असे वाटते की लग्न खूप मोठी बाब आहे अन् त्याविषयीचा तेवढाच मोठा निर्णयही आहे. त्यामुळे जोडीदाराचे अन् माझे विचार जुळायला हवेत. कारण आमच्या लाइफस्टाइलचा विचार करता ही बाब खरोखरच खूप महत्त्वाची आहे. यावेळी शिल्पाला असेही विचारण्यात आले की, तू एखाद्या पुरुषाची कंपनी मिस करीत नाहीस काय? त्यावर तिने हसतहसत उत्तर देत म्हटले की, ‘अजिबात नाही’!