Join us
Daily Top 2Weekly Top 5

शशी शर्मा दुहेरी भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 13:27 IST

सुहानी सी एक लडकी या मालिकेत आजीची भूमिका साकारणाऱया शशी शर्मा काही दिवसांच्या ब्रेकवर गेल्या होत्या. शशी यांच्या पतीची ...

सुहानी सी एक लडकी या मालिकेत आजीची भूमिका साकारणाऱया शशी शर्मा काही दिवसांच्या ब्रेकवर गेल्या होत्या. शशी यांच्या पतीची तब्येत खराब असल्याने त्यांनी सुट्टी घेतली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाला शशी लवकरच सुरुवात करणार आहेत. शशी या मालिकेत आता प्रेक्षकांना दुहेरी भूमिकेत दिसणार असून या मालिकेत आजीच्या जुळ्या बहिणीची एंट्री होणार आहे. आजींचा अपघात झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि या अपघातानंतर घरी परतेली आजी ही खूपच वेगळी असल्याचे सगळ्यांच्या लक्षात येणार आहे. या आजींची वेशभूषा आणि स्वभाव हा खूपच वेगळा आहे. शशी या मालिकेत आता रंगीबेरंगी साड्यांमध्ये आणि छोट्या केसांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत शशी ही तिसरी व्यक्तिरेखा साकारत आहेत. याआधी शशी यांनी आजीच्या आईची भूमिकाही साकारली होती.