Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बहू हमारी रजनी-कान्त’ मालिकेत शशी किरण यांची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 12:00 IST

‘बहू हमारी रजनी-कान्त’ या एका विनोदी भूमिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्याची एंट्री होणार आहे.  विनोदी कथानकामुळे या मालिकेने रसिकांचे भरघोस ...

‘बहू हमारी रजनी-कान्त’ या एका विनोदी भूमिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्याची एंट्री होणार आहे.  विनोदी कथानकामुळे या मालिकेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. आणि आता बॉलीवूडमधील ज्येष्ठअभिनेते शशी किरण हे लवकरच मालिकेत एका विशेष भूमिकेत झळकणार आहेत.शशी किरण हे मालिकेत एका सल्लागाराची भूमिका साकारणार असून घटस्फोटापूर्वी शान आणि रजनी यांना सहा महिने एकत्र राहण्याची अट कोर्टाने घातली आहे त्यामुळे एका सल्लागाराच्या (काऊन्सिलर) भूमिकेद्वारे शशी किरण मालिकेत एंट्री करतील. त्यांच्या व्यक्तिरेखेच्या रूपाने मालिकेत आणखी एक विनोदी व्यक्तिरेखा निर्माण होईल.या मालिकेतील प्रवेशाबद्दल विचारणा केली असता शशी किरण म्हणाले, “मालिकेत मी एका काऊन्सिलरची,भूमिका साकारणार आहे. तो शान आणि रजनी यांना मार्गदर्शन करील. माझ्या व्यक्तिरेखेची खासियत म्हणजे, मला फक्त हिंदी बोलता येतं आणि मी शुध्द हिंदी भाषेत संस्कृतशब्दांचा संभाषण करतो. त्यामुळे मालिकेत अनेक विनोद निर्माण होतात. तसंच सुमारे 10 वर्षांपूर्वी मी ‘यह दुनिया है रंगीन’ या मालिकेत पल्लवी प्रधान यांच्याबरोबर भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर काम करताना मला आनंद होत आहे.”शशी किरण यांनी बॉलीवूडमधील पार्टनर, जुडवा, हीरो नं. 1, बिवी नं. 1, बडे मियाँ, छोटे मियाँ, शादी नं. 1, भूतनाथ, 'जय हो' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून आता ते ‘बहू हमारी रजनी-कान्त’ या मालिकेत एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील