Join us  

अखेर सत्याचा झाला विजय..! ‘तारक मेहतां’नी जिंकला असित मोदींविरोधातला खटला, म्हणाले- "ही लढाई..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 1:39 PM

तारक मेहता शोच्या निर्मात्यांविरुद्ध शैलेश लोढा यांनी दाखल केलेल्या खटल्याचा निकाला आला आहे.

गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' काही दिवसांपासून वादात आली आहे. मालिकेत काम करणाऱ्या काही कलाकारांनी निर्माते असितकुमार मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या १४ वर्षांपासून यात तारक मेहताची भूमिका साकारलेल्या शैलेश लोढा (Shailesh Lodha)  यांनीच गेल्या वर्षी मालिका सोडली. मालिकेच्या निर्मात्यांवर मानधन न दिल्याचे आरोप करत खटला दाखल केला होता. एका रिपोर्टनुसार शैलेश ही केस जिंकलं आहेत. 

रिपोर्टनुसार , तारक मेहता शोच्या निर्मात्यांविरुद्ध शैलेश लोढा यांनी दाखल केलेल्या खटल्याचा निकाल मे महिन्यात आला होता. शैलेश नीलोढा यांनी एप्रिल 2022 मध्ये TMKOC सोडले आणि या वर्षाच्या सुरूवातीला, त्यांनी थकबाकीच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजेच NCLT शी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.  या प्रकरणाची सुनावणी झाली आणि दोन्ही पक्षांच्या वकिलाद्वारे सेटलमेंट करण्यात आले. असित मोदी यांनी शैलेश यांना सेटलमेंट अटींनुसार १ कोटी ५ लाख ८४ हजार रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे द्यावे लागणार आहे.

एका मुलाखतीत शैलेश म्हणाले की, मी या निर्णयावर खूश आहे आणि NCLT चे आभारी आहे. तो म्हणाला, “ही लढाई पैशासाठी कधीच नव्हती. ते न्याय आणि स्वाभिमानाच्या शोधातील होती. मला असे वाटते की मी एक लढाई जिंकली आहे आणि मला आनंद आहे की सत्याचा विजय झाला आहे. माझी थकबाकी क्लिअर करण्यासाठी मी काही कागदपत्रांवर सही करावी अशी त्याची इच्छा होती. मी माध्यमांशी आणि इतर गोष्टींशी बोलू शकत नाही, असं त्यात नमूद केलं होतं. पण मी त्यावर सही केली नाही. माझे स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी मी कोणत्याही कागदपत्रांवर सही का करू?” असं ही ते म्हणाले.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारन्यायालय