Join us

​शाहरूख खान सांगतोय ही आहे माझ्या जीवनातील सर्वात मोठी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 10:10 IST

टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमाद्वारे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असून ‘स्टार प्लस’वरून ...

टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमाद्वारे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असून ‘स्टार प्लस’वरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाने शाहरूख खान, ‘टेड टॉक्स’ आणि ‘स्टार इंडिया’ या तीन महत्त्वाच्या ब्रॅण्डना एकत्र आणले आहे. याविषयी शाहरुख सांगतो, इंटरनेटद्वारे ‘टेड टॉक्स’ची लोकप्रियता वाढण्यापूर्वीपासूनच मी ‘टेड टॉक्स’चा फार मोठा चाहता होतो. या कार्यक्रमाला मी माझ्या जीवनातील माझी सर्वात मोठी कमाई मानतो, या कार्यक्रमाने मला स्वत:ला व्यक्त होण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी एक कलाकार आहे, जो भावना व्यक्त करू शकतो, गाणं गाऊ शकतो किंवा नाचू शकतो. मी एक मित्र, वडील, पती, उद्योगपती असलो, तरी ‘टेड टॉक्स’ने मला माझ्यातील व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी जेव्हा या कार्यक्रमात सर्वप्रथम भाषण केले, तेव्हा मी मनातून काहीसा घाबरलो होतो. पण या कार्यक्रमाचे प्रमुख ख्रिस अ‍ॅण्डरसन यांनी मला धीर दिला. जगात काय घडत आहे, त्याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत असतं, हेच कुतुहल माझ्याही मनात असल्याने मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचे ठरवले. या कार्यक्रमात मी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींचे विचार आणि संकल्पना भारतीय प्रेक्षकांपुढे सादर करणार आहे. मी लहान असताना माझे पालक, मित्र आणि शिक्षकांनी मला जे काही शिकवलं, त्यामुळे जगात काय घडतं, ते जाणून घेण्याची एक तळमळ माझ्या मनात निर्माण झाली. मला एखाद्याने काहीतरी सांगितले आणि ते मला ठाऊक नसेल, तर मला स्वत:ला फार अस्वस्थ व्हायला होते. या कार्यक्रमाद्वारे तर मला जगातील अनेक गोष्टी जाणून घेता येणार आहेत.टेड टॉक्स या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती नव्या संकल्पना आणि सिद्धांत मांडतील. परंतु ‘टेड टॉक परिषदां’पेक्षा हा कार्यक्रम वेगळा असेल. त्या परिषदांचे प्रसारण कंपनीतर्फे केले जाते आणि ते टीव्ही कार्यक्रम म्हणून गणले जात नाहीत. शाहरूखचा कार्यक्रम हा या कंपनीने खास टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी तयार केलेला पहिलाच कार्यक्रम आहे.Also Read : सुपरस्टार झाल्यानंतरही घर चालवण्यासाठी शाहरुख खान करायचे 'हे' काम