Join us

‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर शाहरुख आणि अनुष्कासह अवतरला हा पाहुणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 12:12 IST

किंग खान शाहरुख आणि अनुष्का शर्मा त्यांच्या आगामी हॅरी मेट सेजल या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन करत आहेत. विविध ...

किंग खान शाहरुख आणि अनुष्का शर्मा त्यांच्या आगामी हॅरी मेट सेजल या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन करत आहेत. विविध रिअॅलिटी शो आणि मालिकांच्या सेटवर जाऊन सिनेमा रसिकांपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच निमित्ताने शाहरुख आणि अनुष्का प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता’मध्ये येणार आहेत.काही दिवसांपूर्वी या भागाचं शूटिंगही पार पडलं.शाहरुख आणि अनुष्काचा सहभाग असलेला मालिकेचा हा भाग पाहण्यासाठी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र ज्यावेळी या खास भागाचं शूटिंग करण्यात आलं त्यावेळी किंग खान शाहरुख आणि अनुष्कासह मालिकेच्या सेटवर एक अवचित पाहुणा अवतरला होता. या अवचित आलेल्या पाहुण्याला पाहून सारेच अचंबित झाले.किर्ती आणि नक्ष यांच्या साखरपुड्याच्या सीनमध्ये शाहरुख आणि अनुष्का झळकणार आहेत. किर्ती आणि नक्ष यांच्या या साखरपुड्यासाठी सारे कुटुंबीय उत्साही आहेत. त्यातच शाहरुख आणि अनुष्का या सोहळ्यात येत असल्याने कुटुंबीयांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या विशेष भागासाठी शाहरुख आणि अनुष्काचं मालिकेच्या युनिटसह शूटिंग सुरु होतं. त्याचवेळी किंग खान शाहरुखच्या बॉडीगार्ड्सनी तिथं एका बिबट्या येत असल्याचं पाहिलं. हे पाहून सारेच अचंबित झाले. 'ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचा सेट अशा ठिकाणी आहे जिथं जंगली प्राणी विशेषतः बिबटे वारंवार पाहायला मिळतात.बिबट्या आल्यानं या विशेष भागाचं शूटिंग दुपारी 2 वाजल्यापासून सुरु होते जे रात्री उशिरा 2 वाजता संपलं.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदाच बिबट्या अवतरला असं नाही. याआधीही एक दोनदा बिबट्यानं मालिकेच्या सेटवर धुमाकूळ घातला होता. 'हॅरी मेट सेजल' सिनेमाच्या निमित्ताने पार पडलेल्या विशेष भागाच्या सीनमध्येही बिबट्याने हजेरी लावल्याने काही काळ सा-यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.