अर्शीने हे रहस्य तेव्हा उघड केले जेव्हा एका टास्कदरम्यान प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या आयुष्याशी निगडित एका घटनेचा खुलासा करायचा होता. सध्या या शोमध्ये अर्शी सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक आहे. अर्शी घरातील तिच्या वागणुकीवरून नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी अर्शी प्रियांक शर्मा आणि सपना चौधरी यांनी उघड केलेल्या तिच्या काही खासगी गोष्टींमुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अर्शीने तिचा मित्र आकाश ददलानी याच्यासोबत असे काही वर्तन केले ज्यामुळे त्याचे शोषण झाल्याची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा तिचा प्रियांक शर्माबरोबर वाद झाला असून, ती चर्चेत आली आहे.
एकूणच घरातील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धकांमध्ये अर्शी खान हिचेही नाव असून, ती घरात जेवढी चर्चेत आहे, तेवढीच बाहेरच्या दुनियेत चर्चित आहे. त्याचबरोबर अर्शीने अफ्रिदीबद्दल केलेला खुलासा ऐकून एक गोष्ट आणखी स्पष्ट होते की, चर्चेत राहण्यासाठी अर्शी काहीही करू शकते. असो, अर्शीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना पसंत येत असल्यानेच ती आज घरातील प्रबळ स्पर्धकांपैकी एक आहे.