Sexy Women In Asia Nia Sharma म्हणतेय मीच सर्वात सेक्सी?काय आहे कारण जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 14:07 IST
सेक्सी वुमेन इन एशिया ठरलेली निया शर्माने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर फोटोशूटचा एक सेक्सी व्हिडिओ ...
Sexy Women In Asia Nia Sharma म्हणतेय मीच सर्वात सेक्सी?काय आहे कारण जाणून घ्या
सेक्सी वुमेन इन एशिया ठरलेली निया शर्माने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर फोटोशूटचा एक सेक्सी व्हिडिओ शेअर केला होता. तिचा हा हॉट अंदाज मात्र काही लोकांना आवडला नाही आणि त्यांनी तिला नको-नको ते नाव ठेवण्यास सुरूवात केली. मात्र आता शेअर केलेल्या नियाच्या नवीन फोटोशूटला खूप चांगल्या प्रतिक्रीया मिळताना दिसतायेत.नियाने या फोटोशूटची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या फोटोशूटमध्ये नियाचा मादक अंदाज लक्षवेधी ठरत आहे.काही महिन्यांपूर्वी एका अवॉर्डशोमध्ये निया अतिशय मादक रुपात अवतरली होती.या अवॉर्डशोमध्ये नियाने परिधान केलेला ड्रेसिंग स्टाइलमुळे ती अधिक हॉट दिसत होती. याच लूकमध्ये या अवॉर्डशोमध्ये पोहोचल्यानंतर नियाची चर्चा सुरू झाली होती.पण त्याचबरोबर ती सोशल मीडिया अकाऊंटवरही तिचे रोजचे बिनधास्त फोटो शेयर करत असते.निया लवकरच नव्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे.एका व्हिडिओ साँगमधून तीचा हटके आणि बोल्ड लुक रसिकांना पाहायला मिळणार आहे.नुकतेच तिने या गाण्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.तिने शेअर केलेले हे फोटो याच गाण्यातील असून यांत तिचा नेहमीप्रमाणे तिचा बोल्ड आणि सेक्सी लुक पाहायला मिळतोय.या फोटोत तिने काळ्या रंगाचा वनपीस घातलेला असून एका स्विमींग पुलजवळ उभी असल्याचे दिसतेय.तिचे हेच मादक सौदर्य बघून तिला सोशल मीडियावर भरपुर लाईक्स आणि कमेंटस मिळतायेत.लवकरच ती निया विक्रम भट्टच्या वेब सिरीजमधल्या ''रात की''..... या गाण्यातून तिचा बोल्ड लुक पाहायला मिळणार आहे.नुकतेच या गाण्याचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. याविषयी ती म्हणते,‘ विक्रम भट्ट यांच्या वेब सिरीजमध्ये काम करणे माझ्यासाठी फार वेगळा अनुभव होता.टीव्हीच्या दैनंदिन कामापेक्षा काही तरी हटके करायला मिळणार म्हणून मी पाचच मिनिटांत काम करण्यास तयार झाले असल्याचे नियाने सांगितले.