Join us

'बालवीर'फेम देव जोशी झळकणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 12:36 IST

आजपर्यंत अभिनेता देव जोशी आपल्या बालकलाकार म्हणून अनेक भूमिकांमधून पाहायला मिळाला आहे.'बालवीर' या मालिकेतील बालवीर भूमिकेेने त्याला प्रचंड लोकप्रियता ...

आजपर्यंत अभिनेता देव जोशी आपल्या बालकलाकार म्हणून अनेक भूमिकांमधून पाहायला मिळाला आहे.'बालवीर' या मालिकेतील बालवीर भूमिकेेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.देवसोबतच या मालिकेत मनिषा ठक्कर, सुदीपा सिंग, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच करिश्मा तन्ना, शमा सिकंदर, सुगंधा मिश्रा, श्वेता तिवारी, दिपशिखा, रश्मी घोष, श्रुती सेठ, श्वेता कवात्रा यांसारखे छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध चेहरेही या मालिकेत झळकले होते. ही मालिका 2012ला सुरू झाली होती. या मालिकेने1000 भाग पूर्ण केले होते त्यानंतर काही कारणास्तव ही  मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला होता.त्यावेळी मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करताना मला खूपच वाईट वाटले.मी 'बालवीर' या मालिकेला,माझ्या व्यक्तिरेखेला खूप मिस करणार. या मालिकेने मला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार असल्याचेही त्याने म्हटले होते." त्यानंतर देवनेही अभियातून काही वेळेसाठी ब्रेक घेतला होता.बालकलाकार म्हणून ओळखला जाणारा  देव जोशी आता स्टार भारतवरील चंद्रशेखर या ऐतिहासिक मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.लहानपणचा चंद्रशेखर सध्या अयान झुबैर रेहमानी साकारत असून आता मोठ्‌या चंद्रशेखरच्या रूपात देव जोशी दिसून येईल.त्याच्या आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितपणे वेगळी असेल.निर्मात्यांनी ह्या भूमिकेसाठी योग्य कलाकार निवडण्यासाठी पुरेसा वेळ घेतला आणि  देव जोशीची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी त्याची या मालिकेत निवड करण्यात आली आहे.देव जोशीने आपला अनुभव सांगितला,“ह्या शो चा हिस्सा बनताना मला खूप आनंद होत आहे आणि अभिमानही वाटत आहे.चंद्रशेखर आझाद हे भारताचे स्वतंत्रतासेनानी होते आणि त्यांचे योगदान विसरणे अशक्य आहे.स्वतंत्रतासेनानीच्या आयुष्यावर बेतलेला ही मालिका नक्कीच रसिकांच्या पसंती उतरले याची खात्री असल्याचे त्याने म्हटले आहे.”Also Read:स्नेहा म्हणते,जागरानी देवीची भूमिका साकारताना मी अनेक गोष्टी शिकतेयतसेच या मालिकेत अनेक लोकप्रिय चेहरेही झळकणार आहेत.'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत सत्यजित शर्मा बसंत या भूमिकेत झळकला होता.त्याची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र टरली होती.बाल विवाह यावर 'बालिका वधू' मालिकेने भाष्य केले होते.या मालिकेतील सगळेच भूमिका गाजल्या.त्यात बसंतची ही भूमिकाही रसिकांनी पसंत केली होती.आता सत्यजित शर्मा पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे.