Join us  

करण जोहर माधुरीला घेऊन तयार करणार 'या' चित्रपटाचा सीक्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 9:36 AM

डान्स दिवानेच्या मंचावर माधुरी दीक्षित आणि करण जोहर काही जुन्या आठवणींना उजाळा देत 'कुछ कुछ होता है'मधील लडका बडा अनजाना है या गाण्यावर थिरकले.

ठळक मुद्देलवकरच माधुरी आपल्याला अनिल कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.'टोटल धमाल'मध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार

कलर्सच्या डान्स दिवाने मध्ये भारतातील तीन पिढ्यांना डान्स विषयीची त्यांची दिवानगी सादर करण्यासाठी एक समान मंच उपलब्ध करून दिला आहे आणि त्याची प्रेक्षकांनी स्तुती केली आहे. या वीकेंडला, मनोरंजनाचा स्तर अजून उंचावणार आहे कारण धडकचे कलाकार- इशान खट्टर, जान्हवी कपूर दिग्दर्शक करण जोहर सोबत विशेष अतिथी बनून येणार आहेत.

या एपिसोडचा मुख्य भाग असणार आहेत आलोक आणि शौर्याची कामगिरी आणि ती करण जोहर यांना समर्पित केलेली होती. त्यांनी एका मिसळीतून कुछ कुछ होता है ची संपूर्ण कथा पुन्हा तयार केली. ही कामगिरी पाहिल्यानंतर, करण जोहर अगदी भारावून गेले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या भावनांचे वर्णन करताना करण जोहर म्हणाले, “ आलोक आणि शौर्या अतिशय गुणवान आहेत आणि भावी सुपरस्टार बनण्याचे संभाव्य गुण त्यांच्यात आहेत. या अतिशय सुंदर कामगिरीने मला कुछ कुछ होता हैचा सिक्वेल बनविण्याची प्रेरणा दिली आहे.”

काही जुन्या आठवणींना उजाळा देत माधुरी आणि करण कुछ कुछ होता है मधील लडका बडा अनजाना है या गाण्यावर थिरकले, काजोल आणि शाहरुख खान सारखेच. माधुरी आणि करण पुन्हा एकत्र डान्स शो वर एकत्र येण्यासाठी आनंदित झाले होते.

लवकरच माधुरी आपल्याला अनिल कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दिग्दर्शक इंदर कुमारचा चित्रपट 'टोटल धमाल'मध्ये माधुरी आणि अनिल झळकणार आहेत. टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे.

टॅग्स :माधुरी दिक्षितकरण जोहर