Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामानंद सागर यांच्या पणतीचे फोटो पाहून म्हणाल, बोल्डनेसमध्ये पूनम पांडे देखील पडतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 06:00 IST

साक्षीने तिचे बिकनीमधील अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ठळक मुद्देरामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा काही महिन्यापूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. साक्षी चोप्राने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेटिझन्सचा घाम फोडला होता.

रामायण या मालिकेला ऐंशीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ही मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण या कार्यक्रमांची आठवण आली होती. रामायण या मालिकेचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करता ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 

'रामयण' आठवताच रामानंद सागर यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रामानंद सागर यांचा वारसाही पुढे चालवणारे त्यांचे कुटुंबिय नेमके कसे असतील, काय करतात याविषी कुतुहूल निर्माण होणे साहजिकच आहे. रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा काही महिन्यापूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. साक्षी चोप्राने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेटिझन्सचा घाम फोडला होता. साक्षी चोप्राची रामानंद सागर यांची पणती अशी ओळख असली तरी ती एक गायिका आहे.

साक्षीने तिचे बिकनीमधील अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साक्षीचे तिच्या नावाने एक यू-ट्यूब चॅनल देखील असून त्यावर ती व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यात साक्षी आपल्याला गाणे गाताना दिसते. गायिका असण्याबरोबरच साक्षी व्हिडीओ ब्लॉगर आहे.

तिचे अनेक व्हिडीओ यू ट्यूबवर हिटही ठरले आहेत. तिचे गाण्याचे व्हिडीओ जसे सोशल मीडियावर हिट ठरतायेत तसेच तिचे बोल्ड फोटोही सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतायेत.

मात्र साक्षीच्या या बोल्ड फोटोंमुळे तिच्या कुटुंबियांनी साक्षीचा त्यांना अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते. याविषयी साक्षीचे आजोबा मोती सागर यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, साक्षी सध्या सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखली जाते.

तिच्या मेहनतीने ती सागर घराण्याचा वारसा पुढे नेत आहे. ती स्वतःला एक कलाकार म्हणून नाही तर ब्रँड म्हणून अ‍ॅस्टॅब्लिश करत असल्याचे पाहून खूप आनंद होत आहे.

टॅग्स :रामायण