Join us
Daily Top 2Weekly Top 5

भार्गवी चिरमुलेने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; वेस्टर्न ड्रेसमधील फोटो पाहून नेटकरी झाले सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:00 IST

Bhargavi chirmule: या फोटोमध्ये ती क्रॉप टॉप, जीन्स, नवीन हेअर स्टाइल अशा लूकमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिने हे ट्रान्सफॉर्मेशन खास मालिकेसाठी केलं आहे.

मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. आतापर्यंत भार्गवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती 'आई: मायेचं कवच' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे ही मालिका सुरु झाल्यापासून ती साध्या वेशात वावरत आहे. या मालिकेत तिने आईची भूमिका साकारल्यामुळे ती प्रेक्षकांना कायम साडीमध्येच पाहायला मिळते. मात्र, आता या मालिकेमध्ये तिच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. साडीत वावरणारी ही आई चक्क वेस्टर्न लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सध्या तिच्या फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

या मालिकेतील भार्गवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये ती क्रॉप टॉप, जीन्स, नवीन हेअर स्टाइल अशा लूकमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिने हे ट्रान्सफॉर्मेशन खास मालिकेसाठी केलं आहे.  या मालिकेत सध्या सुहानीचा तिच्या आईवरचा विश्वास कमी झाला असून ती मित्रमंडळी आणि बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवते. यात तिच्याकडून अनेक चुका होतात. त्यामुळेच वाट चुकलेल्या लेकीला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मिनाक्षी (भार्गवी चिरमुले) हा नवा ट्रान्सफॉर्मेशन करुन तिच्या कृतीतून सुहानीला तिची चूक समजावून सांगणार आहे.

दरम्यान, बेपत्ता झालेल्या सुहानीच्या शोधात असताना मिनाक्षीला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आहे. आता पुरावा काय असेल ? सुहानी नक्की कुठे आहे ? सत्यापर्यंत ती कशी पोहचणार. कसा असेल मिनाक्षीचा पुढचा प्रवास या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत. 

टॅग्स :भार्गवी चिरमुलेसेलिब्रिटीटेलिव्हिजन