बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लोकेश तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन आहे. ती नेहमीच सोशल हॅण्डलवर तिचे जिम वर्कआउटचे व्हिडीओज् आणि फोटो पोस्ट करीत असते. बिग बॉसच्या घरात इंडियावाले यांच्याकडून रिप्रजेंट करणारी लोकेश बिग बॉसच्या घरात सलमानची फेव्हरेट होती. तिची बोलण्याची शैली सलमानला खूपच आवडत होती. त्यामुळे कमीत कमी काळत घरात वास्तव्य केल्यानंतरही ती चांगलीच प्रसिद्ध झाली. आता तर तिच्या फिगरमुळे ती चर्चेत राहत असून, तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ होत आहे.
२६ वर्षीय लोकेश दिल्ली येथे राहणारी आहे. २४ मार्च १९९१ मध्ये जन्मलेल्या लोकेशला गाणी, डान्स या व्यतिरिक्त ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. तिने इकॉनॉमिक्स पद्व्युत्तर पद्वीचे शिक्षण घेतले. सध्या ती रिअॅलिटी शोवर लक्ष ठेवून आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, लोकेश लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. लोकेशने बदलेला लूक पाहता ती त्याची तयारी करीत असावी, असेच काहीसे दिसत आहे. दरम्यान, लोकेशचे काही खास फोटोज् आम्ही आज तुम्हाला दाखविणार आहोत.