SEE PICS : ‘बिग बॉस’ फेम लोकेश कुमारीने घटविले वजन; नव्या लूकमध्ये दिसते एकदम फिट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:40 IST
‘बिग बॉस’च्या सीजन १० मध्ये सहभागी झालेली स्थुल लोकेश कुमारी तुम्हाला आठवते काय? होय, तिच दिल्ली गर्ल...! आपल्या बोलण्याच्या ...
SEE PICS : ‘बिग बॉस’ फेम लोकेश कुमारीने घटविले वजन; नव्या लूकमध्ये दिसते एकदम फिट !
‘बिग बॉस’च्या सीजन १० मध्ये सहभागी झालेली स्थुल लोकेश कुमारी तुम्हाला आठवते काय? होय, तिच दिल्ली गर्ल...! आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या लोकेशचा लूक सध्या प्रचंड बदलला आहे. तिचा नवा लूक बघितल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरातील हीच का ती लोकेश? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. ट्रान्सफॉर्मेशननंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याच्या अदा दाखविणारी लोकेश गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असल्याचे दिसत आहे. लोकेशने नुकतेच तिचे काही फोटोज् शेअर केले असून, त्यामध्ये ती खूपच फिट दिसत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लोकेश तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन आहे. ती नेहमीच सोशल हॅण्डलवर तिचे जिम वर्कआउटचे व्हिडीओज् आणि फोटो पोस्ट करीत असते. बिग बॉसच्या घरात इंडियावाले यांच्याकडून रिप्रजेंट करणारी लोकेश बिग बॉसच्या घरात सलमानची फेव्हरेट होती. तिची बोलण्याची शैली सलमानला खूपच आवडत होती. त्यामुळे कमीत कमी काळत घरात वास्तव्य केल्यानंतरही ती चांगलीच प्रसिद्ध झाली. आता तर तिच्या फिगरमुळे ती चर्चेत राहत असून, तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ होत आहे. २६ वर्षीय लोकेश दिल्ली येथे राहणारी आहे. २४ मार्च १९९१ मध्ये जन्मलेल्या लोकेशला गाणी, डान्स या व्यतिरिक्त ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. तिने इकॉनॉमिक्स पद्व्युत्तर पद्वीचे शिक्षण घेतले. सध्या ती रिअॅलिटी शोवर लक्ष ठेवून आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, लोकेश लवकरच एका रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. लोकेशने बदलेला लूक पाहता ती त्याची तयारी करीत असावी, असेच काहीसे दिसत आहे. दरम्यान, लोकेशचे काही खास फोटोज् आम्ही आज तुम्हाला दाखविणार आहोत.