या फोटोत अभिनेता भारत गणेशपुरे लादी पुसताना पाहायला मिळत आहे. स्वतः कुशल बद्रिके हा भांडी घासताना दिसत आहे.
सागर कारंडे तर साफसफाई करताना आणि श्रेया बुगडे चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहे.
अरे संसार संसार… झाडू, लादी, भांडी कर… तुला दिली रे देवाने… एक बायको डोक्यावर... अशी पोस्टही कुशलने या फोटोसह टाकली आहे. कुशलच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे. रसिकांना आपल्या लाडक्या विनोदवीरांचा हा अवतार चांगलाच भावल्याचं यावरुन पाहायला मिळत आहे.
cnxoldfiles/a>, सोनम कपूर, कंगणा राणौत, विद्या बालन,श्रीदेवी या कार्यक्रमात हजेरी लावत फुल ऑन मस्ती केली. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी या मंचावर हजेरी लावत त्यांचा मराठमोळा अंदाजही पाहायला मिळाला. मराठी भाषाही बोलता येत नसली तरीही या भाषेतला गोडवा समजून स्वत:ही खूप मजा मस्ती करताना दिसले. त्यामुळे बी-टाऊनची मंडळी या मराठमोळ्या अंदाजाच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले.थुकरटवाडीत अर्थात चला हवा येऊ द्या या मराठमोळ्या शोमध्ये येण्यासाठी प्रत्येक सेलिब्रेटींमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळतो.