दिव्यांकाच्या लग्नाचा लेंहगा पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 14:27 IST
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या आपल्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे.कधी ती ज्वेलरी शॉपिंग करताना दिसतेय तर कधी प्री-वेडिंग पार्टी ...
दिव्यांकाच्या लग्नाचा लेंहगा पाहा
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या आपल्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे.कधी ती ज्वेलरी शॉपिंग करताना दिसतेय तर कधी प्री-वेडिंग पार्टी करताना पाहायला मिळालीय. 8 जुलैला दिव्यांका विवेक दाहियासह रेशीमगाठीत अडकणार आहे.सध्या आपल्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत दिव्यांका लग्नाची तयारी करतेय.. फॅशन फोटोग्राफर विरलनं नुकतंच दिव्याकांच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या लेंहग्याचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला.दिव्यांकानं सांताक्रुझ पश्चिम इथल्या कल्की या फॅशन स्टोरमध्ये अनेक लेंहगे ट्राय केले आणि त्यातील बहुतांशी खरेदीसुद्धा केले.मात्र यापैकी कोणता लेंहगा दिव्यांका तिच्या लग्नात परिधान करणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे.