Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लेक माझी लाडकी आणि विठूमाऊलीच्या महाएपिसोडमध्ये उलगडणार ही गुपिते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 09:28 IST

स्टार प्रवाहवरील 'लेक माझी लाडकी' आणि 'विठूमाऊली' या दोन लोकप्रिय मालिकांचा २४ डिसेंबर रोजी महाएपिसोड होणार आहे. आतापर्यंत असलेल्या ...

स्टार प्रवाहवरील 'लेक माझी लाडकी' आणि 'विठूमाऊली' या दोन लोकप्रिय मालिकांचा २४ डिसेंबर रोजी महाएपिसोड होणार आहे. आतापर्यंत असलेल्या रंजक कथानकाची आणि त्यातल्या प्रश्नांची उत्तरे या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. या दोन्ही मालिकांचे महाएपिसोड प्रेक्षकांना नक्कीच आवडतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 'लेक माझी लाडकी' या मालिकेत मीरा आणि ऋषिकेश यांच्यात संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत मीराने प्रत्येक गोष्ट ऋषीला हवी तशी केली. ऋषी मात्र तिच्या मनासारखे वागत नसल्याने मीरा चिडलेली आहे. ऋषी मीराला धडा शिकवण्यासाठी एक डाव खेळतो. त्याला मीरा कशी सामोरी जाते, कायम खंबीरपणे पाठीशी राहिलेला साकेत मीरासाठी काय करतो, मीरा आपल्याकडे परत यावी ही साकेतची इच्छा पूर्ण होते का या सगळ्या प्रश्नांचा उलगडा रविवारच्या महाएपिसोडमध्ये होईल.'विठूमाऊली' या पौराणिक मालिकेला महाराष्ट्राने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तिन्हीसांजेला विठूदर्शन होत असल्याने अल्पावधीतच ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. विठ्ठलाला तुळस प्रिय का आहे, हे सत्य उलगडणार आहे या विठ्ठल पर्वात. २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाएपिसोडमध्ये तुळशीमहात्म्य पाहायला मिळणार आहे. सत्यभामा ही कलीच्या प्रभावाखाली आहे. त्या प्रभावातून विठ्ठल तिला कशा पद्धतीने मुक्त करतात हे महाएपिसोडमध्ये दाखवले जाणार आहे. अतिशय रंजक वळणावर आलेल्या 'लेक माझी लाडकी' आणि 'विठूमाऊली' या दोन्ही मालिकांत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हे महाएपिसोड नक्कीच पाहावे लागणार आहेत.'लेक माझी लाडकी' आणि 'विठूमाऊली' या दोन्ही टीमसाठी मालिकांचे चित्रीकरण सांभाळून महाएपिसोडचे चित्रीकरण करणे खूपच हेक्टिक होते. पण या दोन्ही मालिकांच्या टीमने या महाएपिसोडचे चित्रीकरण खूप एन्जॉय केले. या महाएपिसोडचे चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच छान होता असे या दोन्ही मालिकांच्या टीममधील कलाकारांचे म्हणणे आहे. या महाएपिसोडमधून अनेक गोष्टी उलगडणार असल्याने या महाएपिसोडची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागलेली असणार यात काही शंकाच नाही. Also Read : ​'लेक माझी लाडकी'तील सानिका म्हणजेच नक्षत्रा मेढेकर मिळवतेय चाहत्यांची दाद