Join us  

आमचं ठरलंय! प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांचे सूर जुळले; मोदक-मॉनिटरने दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 8:25 AM

Prathamesh Laghate-Mugdha Vaishampayan in Relationship: सोशल मीडियावर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Prathamesh Laghate-Mugdha Vaishampayan in Relationship: सारेगमप लिटल चॅम्पसच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोशल मीडियावरून या दोघांवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून तसेच पेजवरून रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. “तुम्हा सर्वांना आमच्याकडून बातमी किंवा घोषणेची अपेक्षा आहे. तेच हेच आहे. शेवटी आमचं ठरलंय!”, असे कॅप्शन देत दोघांनी आपण प्रेमात असल्याची कबुली दिली. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन रिलेशनशिपमध्ये आहेत की काय, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र अखेरीस दोघांनी तशी घोषणा देत जाहीर कबुली दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव

अलीकडेच मुग्धा वैशंपायन हिने M.A. संगीत विषय घेऊन मुंबई विद्यापीठाचे गोल्ड मेडल मिळवले. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशांपायन या दोघांवर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षावर होत आहे. अनेकांनी या दोघांच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. दोघांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशीने वेलकम वहिनी अशी कमेंट केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी दोघांचे अभिनंदन केले आहे . लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनीही दोघांना शभेच्छा दिल्या आहेत. लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले हिने खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे. जगणं सुरेल होऊदे...अशी कमेंट केली आहे.गायिका शरयु दाते, कार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, शमिका भिडे , सावनी रविंद्र यांनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान, प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना #MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे हॅशटॅगही दिले आहेत. तत्पूर्वी सारेगमप लिटल चॅम्पसचे पहिले पर्व खूपच गाजले. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी रसिकांच्या, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. कार्तिकी गायकवाड हिने दोन वर्षांपूर्वी लग्न केले, तर रोहित राऊतनेही गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली.

 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन