Join us

बोल्ड लूकमध्ये दिसली सारा खान,हॉलिडे एन्जॉय करतानाचे शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:35 IST

'बिदाई' या मालिकेमुळे नावारूपाला आलेली सारा खान 'शक्ति...अस्तित्व के एहसास की'या मालिकेत प्रेक्षकांना मोहिनीच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे.मालिकेमुळे ब-याच ...

'बिदाई' या मालिकेमुळे नावारूपाला आलेली सारा खान 'शक्ति...अस्तित्व के एहसास की'या मालिकेत प्रेक्षकांना मोहिनीच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे.मालिकेमुळे ब-याच दिवसापासून चर्चेत नसेलेली सारा पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या ती टांजानियामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. येथे हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही हॉट  फोटोज साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.फोटोजमध्ये सारा समुद्रात बोटीवर मस्ती करताना दिसत आहे.साराचा हा अंदाज भलताच हॉट आणि तितकाच सेक्सी असून ऑरेंज कलरचा बॅकलेस टॉप आणि हॉट पँटमध्ये सारा खूप ग्लॅमरस दिसत आहे.तिने शेअर केलेल्या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.नुकतंच सारा हिला हॉट आणि बोल्ड अंदाज कॅमे-यांनी टिपलं. यावेळी सारासोबत  एका फोटोत मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे. या फोटोलाही तिने कॅप्शन दिली आहे. ओळख कोण आहे तो, ये तो मेरा इश्क है  असे कॅप्शन दिल्यामुळे तिच्या अफेअरच्या चर्चा रंगतायेत. बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्येही सारा खान सहभागी झाली होती.यावेळी सारा खान आणि अली मर्चंट यांचा निकाह पाहायला मिळाला होता.बिग बॉसच्या त्या एपिसोडला ४.४ इतकी टीआरपी मिळाली होती. सारा खानच्या बॉयफ्रेंडची बिग बॉसच्या घरातील एंट्री आणि या दोघांचा निकाह हा टीआरपी वाढवण्याचा फंडा होता.साराला छोट्या पडद्यावरची एक यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिले जाते.तिची हीच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी  पाकिस्तानी टीव्ही मालिकेतही ती  झळकली .पाकिस्तानी टीव्ही मालिकेत झळकणारी सारा ही पहिलीच भारतीय अभिनेत्री होती. बिदाई मालिकेप्रमाणे 'कवच' मालिकेत साकारलेली मंजुलिकाही रसिकांना भावली.'बिदाई' मालिकेपासून आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारी सारा आता पुन्हा एकदा 'शक्ति...अस्तित्व के एहसास' मालिकेच्या माध्यमातून रसिकांवर मोहिनी घालते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.