Join us

"मी चुकीच्या मार्गावर गेले होते...", टेलिव्हिजन जगातील अभिनेत्रीने सांगितली होती आपबिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:13 IST

'चुपके चुपके' या चित्रपटातून तिने कोरिओग्राफर म्हणून पदार्पण केले होते.

2012 साली आलेल्या 'सपने सुहाने लडकपन के' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील अभिनेत्री रुपल त्यागीला या टीव्ही मालिकेतून एक वेगळी ओळख मिळाली. मात्र या मालिकेच्या यशामुळे रुपलच्या खासगी आयुष्यावरही मोठा परिणाम झाला. टीव्ही इंडस्ट्रीत यशस्वी झाल्यानंतर रुपल त्यागीच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला, त्यामुळे तिने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. रूपल त्यागीने  जोश टॉक्समध्ये नुकत्याच दिलेल्या स्पीचमध्ये याचा खुलासा केला होता.

रुपलने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. रुपालीने सांगितले की, ती अभिनेत्री बनण्यासाठी वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईत आली होती. 'चुपके चुपके' या चित्रपटातून तिने कोरिओग्राफर म्हणून पदार्पण केले. रुपलला खूप आनंद झाला की ती करीना कपूरसारख्या मोठ्या अभिनेत्रीला डान्स शिकवत आहे. सुमारे दोन वर्षे तिने कोरिओग्राफर म्हणून काम केलं होते.

यानंतर रुपलने टीव्हीमध्ये अभिनेत्री होण्यासाठी अनेक ऑडिशन्स दिल्या. तिचे एकूण 11 फ्लॉप शो केले, पण 2012 च्या टीव्ही सीरियल 'सपने सुहाने लडकपन के' ने रूपलचे आयुष्य बदलून टाकले. ही मालिका हिट झाल्यानंतर रुपल खूप लोकप्रिय झाली आहे. रूपलने सांगितले की या मालिकेच्या यशाने मला खूप पैसा आणि प्रसिद्धी दिली. पण यशस्वी झाल्यानंतर माझ्या आनंदी नव्हते खूप एकटेपणा जावणत होता. 

एकटेपणा दूर करण्यासाठी इंडस्ट्रीतील लोकांनी मला स्मोकिंग, ड्रिंक आणि पार्टी करण्याचा सल्ला दिला. मग मला या गोष्टींची चटक लागली आहे. पण मला लवकरच समजले की यामुळे मला शांतात मिळणार नाही. त्यानंतर माझा देवावर विश्वास बसू लागला. मी भगवान शंकराचे ध्यान करू लागलो आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार