या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंवरून असे दिसत आहे की, एखाद्या डान्स सीक्वेंसची शूटिंग केली जात असावी.
या फोटोंमध्ये सपना हिरव्या आणि नारंगी रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे, तर अभय ब्ल्यू डेनिम पॅण्ट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे.
या चित्रपटात अभय आणि सपना व्यतिरिक्त अभिनेत्री पत्रलेखाही बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराज हैदर करीत आहेत.
हा चित्रपट एक सुपरनॅचरल लव्ह स्टोरीवर आधारित आहे.
चित्रपट पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. सपना जेव्हा बिग बॉस हाउसमध्ये होती, त्याचवेळी तिच्या या चित्रपटाचे एक व्हिडीओ साँग रिलीज करण्यात आले होते. या व्हिडीओ साँगने सोशल मीडियावर धूम उडवून दिली होती.