Join us
Daily Top 2Weekly Top 5

सपना चौधरी अन् बेनाफ्शा सुनावालाने हरियानवी गाण्यावर लावले ठुमके; व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 18:09 IST

बिग बॉसच्या ११ सीजनमध्ये सहभागी झालेल्या सपना चौधरी आणि बेनाफ्शा सुनावाला यांनी एका हरियानवी गाण्यावर असे काही ठुमके लावले की, त्यांचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

बिग बॉस सीजन-११च्या एक्स स्पर्धक असलेल्या हरियानवी डान्सवर सपना चौधरी आणि मॉडेल बेनाफ्शा सुनावाला यांचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. बेनाफ्शाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती सपना चौधरीसोबत जोरदार डान्स करताना दिसत आहे. हरियानवी गीत ‘आख्यों का ये काजल’ या गाण्यावर दोघींचे ठुमके थक्क करणारे आहेत. वास्तविक सपना बेनाफ्शाला डान्सच्या काही स्टेप्स शिकविताना दिसत आहे. त्यावर बेनाफ्शा सपनाच्या स्टेप्स बघून हुबेहूब तिच्यासारखेच ठुमके लावताना दिसत आहे. 

बेनाफ्शा सुनावालाने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले की, ‘मला सपना खूप आवडते. आम्ही दोघींनी माझ्या या फेव्हरेट गाण्यावर डान्स करून एक वेगळीच पॉझिटिव्हीटी मिळविली. जेव्हा मी दिल्लीला आली होती अन् अर्ध्या रात्री सपना मला तिच्या घरी घेऊन गेली, तेव्हाचा हा प्रसंग आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूपच मजेशीर होता. सपनाचा परिवार खूपच प्रेमळ आहे. विशेषत: सप्पूची मम्मी...
 
बेनाफ्शा ८ जानेवारी रोजी दिल्ली येथे आली होती. यावेळी तिने सपना चौधरीची भेट घेतली. सपनाला भेटून ती एवढी आनंदी झाली की, तिच्या कडेवर जाऊन बसली. त्याचा एक फोटोही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा फोटो शेअर करताना बेनाफ्शाने लिहिले की, ‘हरियाना की शान और मेरी जान... पाहा मी कोणाला भेटली. आय लव लव लव लव लव यू सप्पू. बॅन लव्स यू’ सपना आणि बेनाफ्शा दोघीही बिग बॉसच्या ११व्या सीजनमध्ये सहभागी झाल्या होत्या. आता या दोघीही घराबाहेर पडल्या आहेत.