Join us

​चित्रपटासाठी संदीप मालिका सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 14:15 IST

संदीप आनंद मे आय कम इन मॅडम? या मालिकेत साजनही भूमिका साकारत आहेत. सध्या संदीपला एका चित्रपटाची ऑफर आली ...

संदीप आनंद मे आय कम इन मॅडम? या मालिकेत साजनही भूमिका साकारत आहेत. सध्या संदीपला एका चित्रपटाची ऑफर आली असून त्याने चित्रपटात काम करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. मे आय कम इन मॅडम? या मालिकेच्या लोकप्रियतेत संदीपचा मोठा वाटा असल्याने त्याने ही मालिका सोडू नये असे या मालिकेच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे आणि त्यासाठी ते सध्या प्रयत्नदेखील करत आहेत. संदीपने मालिका सोडू नये यासाठी त्याच्या मानधनात वाढ करण्यात आली असून त्याच्या वेळापत्रकानुसार मालिकेचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याविषयी संदीप सांगतो, "चित्रपटात काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यामुळे चित्रपटाची ऑफर मिळाल्यापासून मी द्विधा मनस्थितीत अडकलो आहे. या सगळ्यात काय मार्ग काढता येईल यावर आमची सध्या चर्चा सुरू आहे."