Join us

​सख्या रे मालिकेत समीर सापडला द्विधा मनस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 16:58 IST

सख्या रे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत ...

सख्या रे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी प्रियंवदाने समीर म्हणजेच रणविजयवर खोटा आळ लावला आहे. तिने सगळ्यांना सांगितले आहे की त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आहे. या सगळ्या प्रकारामुळे समीर म्हणजेच रणविजय चांगलाच टेन्शनमध्ये आला आहे. या सगळ्यातून काही मार्ग काढता येईल का असा विचार सुरू असताना आता प्रियंवदा लग्न करण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करत आहे. काहीही करून तुला माझ्याशी लग्न करावे लागेल असे तिने त्याला सांगितले आहे. परंतु रणविजय हाच समीर आहे हे तिला माहीत नाहीये. तो समीर असल्याने त्याचे प्रेम वैदेहीवर आहे. काहीही झाले तरी त्याला वैदहीसोबत लग्न करायचे आहे. आता या सगळ्यात काय करायचे हे त्याला काहीच कळत नाहीये.रणविजय बनून आलेला समीर आता पूर्णपणे प्रियंवदाच्या जाळ्यामध्ये अडकला आहे. त्याला आता काय करावे हे सुचत नाहीये. वैदेहीवर अपार प्रेम असल्याने काहीही करून तो दुसऱ्या स्त्रीचा आपल्या आयुष्यात विचारच करू शकत नाही.आता समीर प्रियंवदाच्या जाळ्यातून स्वतःला बाहेर काढण्याासाठी काय करेल आणि लग्नाच्या कोंडीतून सुटण्यासाठी तो कोणता मार्ग अवलंबवेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. प्रियंवदा रणविजयचे लग्न होईल? असे झाले तर वैदेहीचे काय होईल? प्रियंवदा तिच्या हेतूंमध्ये यशस्वी होईल का या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच या मालिकेत मिळणार आहेत. सख्या रे या मालिकेत सुयश टिळक, रूची सवर्ण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.