Join us

सलमान खान झलकमध्ये घेणार भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 15:40 IST

झलक दिखला जा या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये अभिनेत्री सुरवीन चावला आणि कोरिओग्राफर सलमान ...

झलक दिखला जा या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये अभिनेत्री सुरवीन चावला आणि कोरिओग्राफर सलमान युसुफ खान भाग घेणार आहेत. सुरवीन सध्या २४ या मालिकेत काम करत आहे. नृत्याची आवड असल्याने तिने या कार्यक्रमात भाग घेण्याचे ठरवले आहे. तर कोरिओग्राफर सलमान युसुफ खानने झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या याआधीच्या तीन पर्वात कोरिओग्राफी केली आहे. तसेच गेल्या पर्वात तो सेलिब्रेटी चॅलेंजर म्हणूनही काही भागांमध्ये दिसला होता. यंदाच्या पर्वात तो स्पर्धक म्हणून झळकणार आहे.