या प्रकरणाविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, अर्शी खान सलमानला भेटण्यासाठी अपॉइन्टमेंट न घेताच गेली होती. जेव्हा गार्ड्सनी तिला याविषयी विचारले तेव्हा अर्शीने म्हटले की, सलमानला भेटण्यासाठी तिच्या मॅनेजरने अपॉइन्टमेंट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मिळाली नाही. मात्र अपॉइन्टमेंट असल्याशिवाय कुणालाही भेटू द्यायचे नाही, यानुसार गार्डनी अर्शी आणि तिच्यासोबतच्या एका महिलेला बाहेरचा रस्ता दाखविला. मात्र अशातही अर्शीने तिचा हट्ट कायम ठेवला. तिने गार्ड्ला म्हटले की, जर सलमान भेटू इच्छित नसेल तर त्याचे वडील सलीम खान यांना भेटू द्या. हा बुके मी त्यांना देईल.
असे म्हटले जात आहे की, अर्शी खानच्या एविक्शनचे कारण सलमान खानसोबत तिने घातलेली हुज्जत असू शकते. कदाचित अर्शीलादेखील हे वाटत असावे, त्यामुळेच तिने सलमान खानची भेट घेणे अधिक संयुक्तिक समजले. तर दुसरीकडे अर्शीचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचेही बोलले जात आहे. कारण बिग बॉस घराबाहेर पडल्यानंतर चर्चेत राहण्यासाठी अर्शी खान नवनवीन फंडे शोधत आहे. खरं तर त्यात तिचा हातखंडाच आहे.