Join us
Daily Top 2Weekly Top 5

​एली एव्हरामचे या गोष्टीसाठी केले सैफ अली खान आणि अक्षय कुमारने कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 11:03 IST

‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्या सिझनमध्ये आपल्याला खूप चांगले परफॉर्मन्स पाहायला मिळाले आहेत. राजू ...

‘स्टार प्लस’वरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्या सिझनमध्ये आपल्याला खूप चांगले परफॉर्मन्स पाहायला मिळाले आहेत. राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा, सुदेश लहरी, एहसान कुरेशी यांसारखे एकापेक्षा एक विनोदवीर या कार्यक्रमानेच इंडस्ट्रीला मिळवून दिले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षयकुमार या कार्यक्रमाचा सुपरजज्ज बनला असून स्वीडनची अभिनेत्री एली एव्हराम ही प्रथमच एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.देशभरातील विनोदवीरांच्या गुणवत्तेचा या कार्यक्रमात कस लागत आहे. विनोदवीर आपल्या विनोदाने आणि कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का एली एव्हराम या कार्यक्रमात होस्टची भूमिका साकारत असली तरी तिचे हिंदी तितकेसे चांगले नाहीये आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमातील विनोद समजणे तिला अवघड जात होते. त्यात ती या कार्यक्रमाची सूत्रसंचालक असल्याने तिने हिंदीतून बोलणे अपेक्षित होते. पण हिंदी ही तिची मातृभाषा नसल्याने हिंदी भाषेतील अनेक शब्दांचे उच्चार करणे तिला कठीण जात होते. पण एका हिंदी रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन ती करत असल्याने ती सध्या हिंदी भाषेचे धडे गिरवत आहे. तसेच हिंदी भाषा शिकण्याच्या अनेक कार्यशाळांमध्येही ती भाग घेत आहे. तिने हिंदी शिकण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचे आता तिला चांगले फळ मिळाले असून ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमासाठी तिची निवड झाल्यावर स्वत: अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी तिच्या हिंदी भाषेची प्रशंसा केली आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात सैफ अली खान सहभागी झाला होता. तसेच अक्षय कुमारनेही तिच्या सूत्रसंचालन कौशल्याची आणि हिंदी भाषेची स्तुती केली आहे. यासंदर्भात एलीशी बोलल्यावर तिने याबाबत आनंद व्यक्त करत सांगितले, “अक्षय आणि सैफ या दोघांनीही माझ्या हिंदी बोलण्याचे कौतुक केल्यावर मला खूपच आनंद झाला. ही भाषा शिकण्यासाठी मी खूपच मेहनत घेतली आहे. मी येवढे चांगले हिंदी बोलू शकेन असे मला कधी वाटले देखील नव्हते.Also Read : अक्षय कुमारला का आली सलीम खान यांची आठवण?