सई ताम्हणकरने लावली संगीत सम्राटच्या सेटवर हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 17:45 IST
संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध, माणसातील संगीताचा शोध घेतला जातो. हा कार्यक्रम केवळ गायकांसाठी नाहीये तर कोणत्याही वाद्यापासून, वस्तूपासून ...
सई ताम्हणकरने लावली संगीत सम्राटच्या सेटवर हजेरी
संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध, माणसातील संगीताचा शोध घेतला जातो. हा कार्यक्रम केवळ गायकांसाठी नाहीये तर कोणत्याही वाद्यापासून, वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून सुमधुर संगीताची निर्मिती करू शकणाऱ्या कलाकारांसाठी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात मुख्यतः गायन, वाद्य वाजवणे, तोंडाने आवज काढून संगीत बनवणे असे परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात स्पर्धक एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होत आहेत. त्यामुळे ढोलपथके, बँड, गावागावातील संगीत या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. संगीत सम्राट या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित राऊत करत आहे तर या कार्यक्रमात क्रांती रेडकर आणि आदर्श शिंदे परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांमधील कला पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी स्पर्धक देखील हजेरी लावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सेलिब्रेटी स्पर्धक कार्यक्रमात येऊन स्पर्धकांना प्रोत्साहन देत आहेत. या कार्यक्रमाच्या एका भागात सई ताम्हणकरने नुकतीच हजेरी लावली. स्पर्धकांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स पाहून सई चांगलीच प्रभावित झाली होती. गेल्या काही वर्षामध्ये नव्या दमाचे अनेक प्रतिभावान कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले आहेत. महाराष्ट्राभर आजही असंख्य कलाकार केवळ एका संधीची, एका व्यासपीठाची वाट पाहात आहेत. अशा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संगीत सम्राट हा कार्यक्रम सुरू झाला आहे.या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात आल्या होत्या. या ऑडिशन्समधूनच प्रतिभाशाली स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.