Join us
Daily Top 2Weekly Top 5

शक्ती...अस्तित्व के एहसास की मध्ये होणार साहिल साहिल मेहताची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 12:27 IST

कलर्सचा पाथब्रेकिंग शो शक्ती...अस्तित्व के एहसास की मधील उच्च प्रतीच्या नाट्यामुळे प्रेक्षक त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. जसलिनशी ...

कलर्सचा पाथब्रेकिंग शो शक्ती...अस्तित्व के एहसास की मधील उच्च प्रतीच्या नाट्यामुळे प्रेक्षक त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. जसलिनशी (अम्रिता प्रकाश) शी लग्न करण्याचा हरमनचा निर्णय, सौम्याचा(रुबिना दिलैक) हरमन(विवियन देसना) पासून लांब जाण्याचा आणि स्वतःचे जीवन निर्माण करण्याचा निर्णय आपण पाहिला आहे. आगामी ट्रॅक मध्ये सौम्याचे जीवन एक नवीन वळण घेताना पहायला मिळणार आहे ज्यात तिला समीर नावाचा एक बिझनेसमन भेटतो. शोच्या कलाकारांमध्ये समांतर भूमिकेत सामील होणार आहे. साहिल मेहता समीरची भूमिका करणार आहेत.समीर हा एक मजेदार प्रेमळ मुलगा असून तो एका खेळण्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचा मालक आहे. हरमन पासून वेगळी झाल्यानंतर तो सौम्याला भेटणार आहे आणि त्याच्या कंपनीत तिला नोकरी देऊन मदत करणार आहे. त्याच्या न चालणाऱ्या कंपनीसाठी सौम्या आशेचा एक नवा किरण आणणार आहे आणि त्याच्या जीवनावर सुध्दा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविणार आहे.त्याच्या भूमिकेविषयी विचारले असता, साहिल मेहताने सांगितले, “शक्तिची लक्षवेधक संकल्पना ही माझ्यासाठी विन विन घटक आहे कारण भारतीय टेलिव्हिजन वर याआधी कधीही दाखविला न गेलेला विषय यात प्रदर्शित केलेला आहे. माझे पात्र असलेला समीर हा एक आनंदी माणूस आहे आणि विक्षिप्त स्वभावाचा आहे पण कधीकधी आळसी सुध्दा आहे. त्याची सौम्याच्या जीवनातील भूमिका महत्वाची आहे. शक्ती सारख्या पाथब्रेकिंग शो मध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्तेजित झालो आहे आणि टॅलेंटेड आणि नामवंत कलाकारां सोबत काम करायला मला खूप आवडेल. मला खात्री आहे की तो एक अतिशय समृध्द करणारा अनुभव असेल.”